VISHWA

v gv

Lockdown शाप की वरदान ?

  Lockdown शाप की वरदान ?


lockdown, quarantine
Lockdown




Corona virus 

चा भारतात शिरकाव झाला आणि कधी नव्हे पण नवीन शब्द कानावर आला, Lockdown 

Lockdown म्हणजे नक्की काय बुवा?
काय असतो Lockdown ?

Qurantine मध्ये करतात काय? 
असे अनेक प्रश्न मनात होते ...

पहिला 21 दिवसाचा Lockdown नंतर 14 दिवसाचा Lockdown

Lockdown च्या सुरवातीच्या आठवड्यात खूप मज्जा आली काम नाही टेंशन नाही , फक्त अराम .... दुसऱ्या आठवड्यात लोक मन रामवण्या साठी मोबाइल, tv चा आधार घेऊ लागले . तिसरा आठवडा येई पर्यंत लोकांची करमणूक संपली होती.सरकारने सुद्धा मनोरंजन साठी दिवे लावणी,थाळी नाद अश्या गोष्टींचे आयोजन केले पण तेच चेहरे, तीच वास्तू, तेच अन्न, रिकामा दिवस या गोष्टीचा मानसिक त्रास चालू झाला होता. त्यात कामे चालू नसल्या मूळे आर्थिक संकटांची सुद्धा भीती होतीच पण अशा होती 21 दिवसाने Lockdown  संपण्याची. 



पण  पेरणी आधीच पाऊस लागावा तसा 21 दिवसाच्या आधीच पुढील 14 दिवसाची घोषणा झाली, आता मात्र लोक हवालदिल झाले होते. पण त्यांच्या कडे ही पर्याय न्हवता, lockdown किती वाढेल याची तिळमात्र कल्पना कुणालाच न्हवती. उडत्या हवेत येणाऱ्या पाचोल्या सारख्या फक्त तारखा कानावर येत होत्या.नागरिक शारीरिक ,मानसिक , आणि आर्थिक बाजूने दुर्बळ झालेले होते. अनेक ठिकाणी सरकार चे कौतुक होत होते तर अनेक ठिकाणी त्यांच्या वर टीका चालू होत्या.  21 दिवसाच्या lockdown मध्ये 21वर्ष देश मागे जाईल असे काही तज्ज्ञांचे म्हणणे होते.एकंदरीत अशी परिस्थिती होती .



Lockdown, Quarantine
Lockdown



प्रश्न खूप आहेत आणि उत्तर त्याहून अधिक.
पण खरंच  lockdown ने एवढा वाईट झालाय का जेवढा आपण समजतोय?
 नक्कीच आर्थिक दृष्ट्या परिस्तिथी खालावली आहे. पण दुरवलेली नाती जवळ आली, सोडून दिलेले छंद पूर्ण झाले, नवीन कला शिकता आल्या, कुटुंब जवळचे वाटू लागले, आपले कोण परके कोण याची जाण झाली लोकांचा अहंकार बाजूला झाला.


  एक नाही तर हजार गोष्टी चांगल्या झाल्या. पण आपण आपली एक माणूस म्हणून झालेली वाढ आपल्या आयुष्याच्या हिशोबात पकडत नाही... आपण आपणच बनवलेल्या पैश्याचा हिशोब करण्यात व्यस्त आहे . यावर आपण विचार केला पाहिजे, जे कुणासोबत घडलं नाही ते आपल्या सोबत घडलंय निसर्गाने आपल्याला संधी छंद जोपासण्याची माणसे समजण्याची, शरीराच महत्व समजण्याची.... 

तस बोलायला गेलं तर खूप आहे ... 

बऱ्याच दिवसा पासून मला पडलेला एक पश्न आहे मला उत्तर सापडल नाही  अजून . तुम्हीच  सांगा उत्तर,
तुमचे उत्तर नक्की कळवा , आणि तुमचे Lockdown चे काही अनुभव असतील तर तेही सांगा


                         Lockdown शाप की वरदान ?                                    




















SHARE

ME VISHWA

Hi. I’m Comman man. I’m VISHWA. I’.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

4 Comments:

  1. माझ्या मते lock down हे आजच्या पिढीसाठी वरदानच आहे. मला आठवते माझ्या लहानपणी आमच्या घरात चिमण्या ये जा करायच्या अणि आम्ही आनंदाने त्यांच्याकडे पाहत चिमण्यांची शाळा भरली म्हणायचो पण कालांतराने चिमण्यांची संख्या अत्यंत कमी झाली व या प्रदूषणामुळे चिमण्या दिसेना झाल्या परंतु आज अनेक वर्षानंतर मी चिमणी पहिली. Lock down चा खरा फायदा या पशू पक्षांना झाला आहे. या दगदगीच्या आयुष्यामध्ये बालपण आठवण्याची संधी lock down मध्ये मिळतोय. घरातल्या लोकांना वेळ देणे, भावंडांबरोबर खेळणे ,गप्पा मारणे या गोष्टी फक्त lock down मुळे शक्य होत आहेत नाहीतर प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात अणि फोन मध्ये व्यस्त असायचा त्यामुळे मी तर अस म्हणेल की वर्षातून एकदा दोनदा lock down असायलाच हवे. पर्यावरण आणि माणुस या दोघांसाठी lock down हे वरदान ठरेल. परंतु lock down मुळे ज्यांचे नुकसान होतेय त्यासाठी पन सरकारने काही तरी योजना करावी ही विनंती 🙏🤗

    ReplyDelete
  2. चांगले विचार आहेत तुमचे, तुमचा नाव नक्की कळवा

    ReplyDelete